*विधी क्षेत्राकडे तरुणांचा कायमचा ओढा; ३ वर्ष LLB सीईटीसाठी ८२,८८३ अर्ज, गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के घट*
*विधी क्षेत्राकडे तरुणांचा कायमचा ओढा; ३ वर्ष LLB सीईटीसाठी ८२,८८३ अर्ज, गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के घट* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, दि. ८ मार्च २०२६** : महाराष्ट्रातील पदवीधर तरुणांमध्ये वकिली पेशा हा करिअरचा प्रमुख पर्याय ठरत असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ३ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी एकूण ८२,८८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या ९४,५०६ अर्जांपेक्षा यंदा ११,६२३ (सुमारे १२.३ टक्के) अर्ज कमी असले तरी, मागील तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा हा आकडा १० टक्क्यांनी जास्त आहे. राज्यातील २१७ विधी महाविद्यालयांमध्ये सुमारे २४,००० जागा उपलब्ध असल्याने, प्रवेशासाठी सरासरी ३.५:१ इतकी स्पर्धा अपेक्षित आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोंदणी प्रक्रिया ८ जानेवारीला सुरू होऊन १३ फेब्रुवारीला मुदतवाढीनंतर संपली. यंदाच्या अर्जदारांमध्ये पदवी पूर्ण केलेले तरुणांसह नोकरी करणारे व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. सीईटी परीक्षा १ आणि २ एप्रिलला मुंबईसह राज्यभराती...