*दररोज ७५ लाख एलपीजी बुकिंग; तरीही देशात गॅस तुटवडा नाही; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राचे कडक निर्देश*
*दररोज ७५ लाख एलपीजी बुकिंग; तरीही देशात गॅस तुटवडा नाही; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राचे कडक निर्देश* *KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, १३ मार्च २०२६: पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्षामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील आयात मार्ग प्रभावित झाल्याच्या अफवांमुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. सामान्य दिवसांत ५० ते ५५ लाख बुकिंग होतात, ती आता ७५ लाखांवर गेली आहेत. मात्र, केंद्र सरकारने स्पष्ट केले की देशात घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे स्थिर आहे. कुठेही ‘ड्राय आउट’ (पुरवठा बंद) झालेला नाही आणि नागरिकांनी पॅनिक बुकिंग किंवा साठेबाजी करू नये. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी ११ मार्चला सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना व डीजीपींना व्हर्च्युअल बैठक घेऊन कडक निर्देश दिले. त्यात म्हटले आहे की, एलपीजी पुरवठ्याची दररोज निगरानी करा, साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करा, अफवा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा. सोशल मीडियावर फेक न्यूज तपासण्यासाठी २४x७ कंट्रोल रूम सुरू करण्यात आल...