**सावधान! बार्शीत दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ; ३० हजारांची स्प्लेंडर चोरीस**
**सावधान! बार्शीत दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ; ३० हजारांची स्प्लेंडर चोरीस** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी - शहरातील भवानी पेठ, सोलापूर रोड परिसरात घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३० जून रोजी घडली. शोहेब रियाज बागवान (वय २८, रा. भवानी पेठ, सोलापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी एमएच-१३-सीव्ही-५३४४ क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी घरासमोर उभी करून घरात गेले. सायंकाळी ७.१० वाजता नमाज पठणासाठी बाहेर आले तेव्हा दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात, नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतल्यानंतरही दुचाकीचा काही पत्ता लागला नाही. अखेर चोरी झाल्याची खात्री झाल्यावर शोहेब यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीस गेलेली दुचाकी काळ्या रंगाची असून त्यावर लाल-निळ्या पट्टे आहेत. याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल...