**सोलापूर जिल्ह्यात नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध**
**सोलापूर जिल्ह्यात नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध** **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. 30 जून 2025 (जिल्हा माहिती कार्यालय)* सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन रास्तभाव दुकानांच्या मंजुरीसाठी शासनाच्या धोरणानुसार जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आज, दि. 30 जून 2025 रोजी उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा जाहीर केला आहे. या जाहिरनाम्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा सुलभ आणि नियमित होण्यास मदत होणार आहे. **जाहिरनाम्याचा तपशील** सदर जाहिरनाम्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी येथे 1 रास्तभाव दुकान आणि बार्शी तालुक्यातील मौजे इंदापूर, घोळवेवाडी, नांदणी, सर्जापूर, हिंगणी पा., दडशिंगे, चिखर्डे आणि सासुरे या गावांमध्ये एकूण 8 रास्तभाव दुकानांच्या मंजुरीचा समावेश आहे. या जाहिरनाम्याची माहिती सर्व तहसील कार्यालये तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्...