**नशेत शाळेत धडकले शिक्षक! चिंचपूरच्या शाळेत मोहळकरांचा धक्कादायक प्रकार; ग्रामस्थांचा संताप**

**नशेत शाळेत धडकले शिक्षक! चिंचपूरच्या शाळेत मोहळकरांचा धक्कादायक प्रकार; ग्रामस्थांचा संताप** 

**KDM NEWS प्रतिनिधी**परंडा, दि. २८ जून २०२५**: चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक पी. एम. मोहळकर दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ८:०५ वाजता उघडकीस आला. यापूर्वी त्यांना अनेकदा समज देऊनही वर्तन सुधारले नसल्याने ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुख्याध्यापकांनी मोहळकर नशेत असल्याचे लक्षात येताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच महेश देवकर यांना कळवले. समिती सदस्य आणि पालकांनी शाळेत पाहणी केली असता, मोहळकर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. याचे पुरावे म्हणून व्हिडिओ चित्रण करण्यात आले.

मुख्याध्यापकांनी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. ग्रामस्थांनी शिक्षकाच्या निलंबनाची मागणी करत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली.

"शिक्षकांचे असे वर्तन अस्वीकार्य आहे. मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते," असे सरपंच देवकर म्हणाले. पालकांनीही शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडून आता त्वरित कारवाईचे पाऊल अपेक्षित आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**