**राज्यात पीक पाहणीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा**

**राज्यात पीक पाहणीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा**  
*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (१७ मार्च) विधानसभेत निवेदन सादर करून ही मुदतवाढ जाहीर केली.

मंत्री बावनकुळे म्हणाले, “राज्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत फक्त ५५.६९ टक्के पीक पाहणी नोंदणी झाली आहे. मूळ मुदत संपत आल्याने ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणून रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्यांनी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. ई-पीक पाहणी ही डिजिटल प्रक्रिया असून, शेतकऱ्यांच्या खऱ्या पिकांची नोंदणी सहाय्यक स्तरावरून होते. ही नोंदणी पूर्ण न झाल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई, पिक विमा, पीक कर्ज व इतर सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.

या मुदतवाढीमुळे उर्वरित शेतकरी आता सहजतेने आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करू शकतील. सरकारने १०० टक्के पीक पाहणीचे लक्ष्य ठेवले असून, जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने नजीकच्या सहाय्यकाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**