**पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या बंदोबस्ताचा आढावा घेतला; डीजीपी सदानंद दाते यांनी पालखी मार्ग व मंदिर परिसराची पाहणी**
**पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या बंदोबस्ताचा आढावा घेतला; डीजीपी सदानंद दाते यांनी पालखी मार्ग व मंदिर परिसराची पाहणी**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १४ जुलै २०२६ :** महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भेट देऊन बंदोबस्त व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. पालखी मार्ग, भाविकांची गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
मा. दाते यांनी पुणे येथून वाहनाने निघून पुणे ग्रामीण, सातारा आणि सोलापूर ग्रामीण हद्दीतील पालखी मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दरम्यान संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर मुक्ताई पोलीस संकुल, पंढरपूर येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या, उपलब्ध सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. पंढरपूर येथे सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक नियंत्रण कक्ष (Integrated Control Room) बद्दलही सविस्तर चर्चा झाली. पोलीस विभागाकडून लावण्यात येणारा बंदोबस्त, त्यातील कमतरता आणि सुधारणांबाबत डीजीपी यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीनंतर सदानंद दाते यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार चौक आणि वाळवंट भागात पायी फिरत भाविकांच्या दर्शन व्यवस्थेचा आणि गर्दी नियंत्रणाचा आढावा घेतला. या ठिकाणी बंदोबस्तात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले.
बैठकीला राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर) रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी काकर्तीकेन, जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी जैन, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, मंदिर समिती, रेल्वे आणि नगरपरिषद पंढरपूर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दिली होती.
आषाढी वारीत मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने सुरक्षा, सुविधा आणि गर्दी नियंत्रणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या