पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*बार्शी : कव्हे गावातील रस्ता वादात तहसीलदारांचा तडजोड आदेश; १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर*

इमेज
*बार्शी : कव्हे गावातील रस्ता वादात तहसीलदारांचा तडजोड आदेश; १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : मौजे कव्हे तालुका बार्शी येथील शेतजमिनीत जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबतच्या दीर्घकाळ चाललेल्या दाव्यात तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दोन्ही पक्षांच्या तडजोडीला मान्यता देत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या आदेशानुसार गट नंबर ८९ व ९० च्या बांधावरून नैसर्गिक पाण्याची वाट आणि १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. संतोष शिवाजी माने, मारुती शंकर माने, लहू श्रीपती माने, शहाजी प्रताप माने, भिमराव भागवत माने, संभाजी चंद्रहार माने, समाधान गुलाबराव माने, राजाराम विभिषण माने, धनाजी चंद्रहार माने, विलास गजेंद्र माने, महादेव नागनाथ माने, भास्कर वसंतराव माने आणि राहुल दिनकर माने या अर्जदारांनी अरुण तुकाराम माने यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. अर्जदारांचा दावा होता की, त्यांच्या गट नंबर ८३, ८४, ८५ व इतर शेतजमिनीत जाण्यासाठी गट नंबर ८९ च्या बांधावरून पूर्वापार रस्ता आहे. मात्र सामनेवाल्याने ३० मे २०२४ रोजी रस्ता नांगरून अडथळा न...

*चिमुकल्या हृदयांना नवी उभारी: डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बाल हृदय तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद*

इमेज
*चिमुकल्या हृदयांना नवी उभारी: डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बाल हृदय तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके), तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे आयोजित ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठीचे मोफत हृदय रोग तपासणी शिबिर आज संपन्न झाले. शिबिरात असंख्य बालकांनी तपासणीचा लाभ घेतला. डॉ. बी. वाय. यादव, डॉ. एस. सी. माने आणि आरबीएसके नोडल ऑफिसर डॉ. इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. जन्मजात हृदयविकार तसेच वाढत्या वयातील हृदयाशी संबंधित तक्रारींचे लवकर निदान आणि उपचार देणे हा उद्देश होता. शिबिरात बालरोग व हृदयविकार तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. २डी-इको, ईसीजी व इतर आवश्यक तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. ज्या बालकांना पुढील उपचार किंवा हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळले, त्यांना आरबीएसके आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नामांकित रुग्णालय...