*चिमुकल्या हृदयांना नवी उभारी: डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बाल हृदय तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद*

*चिमुकल्या हृदयांना नवी उभारी: डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बाल हृदय तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके), तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे आयोजित ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठीचे मोफत हृदय रोग तपासणी शिबिर आज संपन्न झाले. शिबिरात असंख्य बालकांनी तपासणीचा लाभ घेतला.

डॉ. बी. वाय. यादव, डॉ. एस. सी. माने आणि आरबीएसके नोडल ऑफिसर डॉ. इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. जन्मजात हृदयविकार तसेच वाढत्या वयातील हृदयाशी संबंधित तक्रारींचे लवकर निदान आणि उपचार देणे हा उद्देश होता.

शिबिरात बालरोग व हृदयविकार तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. २डी-इको, ईसीजी व इतर आवश्यक तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. ज्या बालकांना पुढील उपचार किंवा हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळले, त्यांना आरबीएसके आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नामांकित रुग्णालयांमध्ये शंभर टक्के मोफत शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जागेवरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

डॉ. बांगर, डॉ. बोपलकर, डॉ. घोंगडे, डॉ. मोरे, डॉ. गुंड, डॉ. केसकर, डॉ. सिंगन, डॉ. इरफान सय्यद यांच्यासह आरबीएसके पथक, एएनएम, फार्मासिस्ट व इतर कर्मचारी सक्रिय होते. व्यवस्थापनासाठी कॅम्प मॅनेजर विपुल शिंदे, दीपक मुंढे, विश्वराज टीम, संपत खताळ, तानाजी बागल, ताकभाते,जयश्री स्वामी, विष्णू बोराडे आणि मांजरे यांनी परिश्रम घेतले.

शिबिरामुळे अनेक पालकांना मुलांच्या हृदयरोगाबाबत वेळेवर मार्गदर्शन मिळाले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बालकांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**