**बार्शी तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन; विधानसभेतील निलंबनाच्या निषेधार्थ कामबंद**
**बार्शी तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन; विधानसभेतील निलंबनाच्या निषेधार्थ कामबंद** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ** (सोलापूर), दि. १७ : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघाच्या बार्शी तालुका शाखेतील कर्मचाऱ्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (१२ डिसेंबर) जाहीर झालेल्या तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या एकतर्फी निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी (१६ डिसेंबर) सामूहिक रजा आंदोलन छेडले. यात तालुक्यातील अनेक महसूल कर्मचारी सहभागी झाले असून, महसूल कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय तलाठी संघाने प्रलंबित मागण्यांसाठी ऑनलाइन कामकाज बंद करण्याचा इशारा दिल्याने नागरिकांना सतत गैरसोय होत आहे. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे विभागातील विविध संघटनांनी हे आंदोलन सुरू केले आहे. यात महसूल सेवक संघटना, वाहन चालक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी संघटना तसेच तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना सहभागी आहेत. बार्शी शाखेने तहसीलदारांना सादर केलेल्य...