पोस्ट्स

**बार्शी ;आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित होणार कापशी-सावरगावचे ग्राम महसूल अधिकारी मिलिंद सावंत**

इमेज
**बार्शी ;आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित होणार कापशी-सावरगावचे ग्राम महसूल अधिकारी मिलिंद सावंत**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : सोलापूर, ३० एप्रिल २०२६ :** महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील कापशी/सावरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी श्री. मिलिंद अशोक सावंत यांना प्रतिष्ठित **आदर्श तलाठी पुरस्कार** जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या महसूल आस्थापना शाखेने काढलेल्या पत्रानुसार, श्री. सावंत यांची निवड मागील दहा वर्षांच्या गोपनीय अहवालातील अत्युत्कृष्ट शेर्यांच्या आधारे करण्यात आली. तलाठी म्हणून उत्कृष्ट कामगिरी, कर्तव्यदक्षता आणि सर्व प्रकारची वसुली १०० टक्के पूर्ण करण्याच्या कामगिरीमुळे त्यांची ही निवड झाली आहे. पुरस्काराचे स्वरूप म्हणून प्रमाणपत्र आणि रु. ५,०००/- (पाच हजार रुपये) चा धनादेश देण्यात येणार आहे. हा पुरस्कार मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, सोहळा **१ मे २०२६ रोजी सकाळी ०७.३० वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय (सोलापूर शहर)** येथे होणा...

**बार्शीत घरासमोरून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल**

इमेज
**बार्शीत घरासमोरून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी:** शहरातील बार्गुळे प्लॉट परिसरात एका कामगाराच्या घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फिर्यादी संजय मधुकर वीर (वय २८, रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सेन्ट्रींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०२४ मध्ये त्यांनी नवीन खरेदी केलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH-१३-EN-८४२०) नेहमीप्रमाणे २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता कामावरून परतल्यावर घरासमोर लावली होती. कुटुंबासह जेवण करून ते झोपले. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उठल्यानंतर दुचाकी दिसली नाही. परिसरात व आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही ती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेल...

**बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेला; जितू मुंडा यांना अखेर १९,३०० रुपयांचा हक्क मिळाला**

इमेज
**बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेला; जितू मुंडा यांना अखेर १९,३०० रुपयांचा हक्क मिळाला**  **KDM NEWS प्रतिनिधी**केओंझार (ओडिशा), ३० एप्रिल २०२६ :** छोट्या रकमेसाठी बँकेत वारंवार चकरा मारून थकलेल्या एका आदिवासी भावाने आपल्या मृत बहिणीचा सांगाडा कबरेतून काढून खांद्यावर घेऊन बँकेत आणल्याची धक्कादायक घटना ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात घडली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि बँकेने तातडीने कारवाई करत जितू मुंडा यांच्यासह इतर वारसांना पैसे दिले. दियानाली गावातील ५० वर्षीय जितू मुंडा यांची मोठी बहीण **कलरा (कालरा) मुंडा** (वय ५६) यांचा २६ जानेवारी २०२६ रोजी अर्धांगवायूने मृत्यू झाला होता. तिने एखाद्या वासरू विकून मिळालेले **१९,३०० रुपये** ओडिशा ग्रामीण बँकेच्या मल्लिपोसी (पाटणा तालुका) शाखेत ठेवले होते.  जितू मुंडा बहिणीच्या खात्यातील हे पैसे काढण्यासाठी अनेकदा बँकेत गेले. बँक कर्मचाऱ्यांनी मात्र मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारस प्रमाणपत्र किंवा खातेदार स्वतः हजर राहणे अशी कागदपत्री अट घातली. अशिक्षित आणि गरीब आदिवासी असलेल्या जितू यांना ही प्रक्रिया समज...

**बार्शीत भक्तिरसाचा महापूर! विजय थोरात यांच्या 'माझ्या हृदयात वसतो भगवंत' भजनाचे दिमाखदार लोकार्पण**

इमेज
**बार्शीत भक्तिरसाचा महापूर! विजय थोरात यांच्या 'माझ्या हृदयात वसतो भगवंत' भजनाचे दिमाखदार लोकार्पण**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** "माझ्या हृदयात वसतो भगवंत, माझ्या प्रत्येक श्वासात भगवंत..." या भावपूर्ण शब्दांनी अवघी बार्शीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री भगवंत प्रगट दिनाच्या मंगलमय पूर्वसंध्येला, प्रसिद्ध भगवंत भक्त विजय कोरे (थोरात) यांच्या २० व्या भक्ती रचनेचा (भजन) भव्य लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी श्री भगवंत मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. **मान्यवरांची मांदियाळी आणि उद्घाटन** कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आणि उद्घाटन प्रसिद्ध कीर्तनकार **ह.भ.प. जयवंत महाराज बोधले** यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार **राजेंद्र (राजाभाऊ) राऊत** यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नगराध्यक्षा **सौ. तेजस्विनीताई कथले** यांनी भूषविले. यावेळी पंचायत समिती अध्यक्षा रोंगे **, प्रशांत कथले**, माऊली उद्योग समूहाचे **अमृत राऊत** आणि ज्येष्ठ पत्रकार **सचिन वायकुळे** आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. **डिजिटल म...

**बार्शी: ७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी जाळ्यात**l

इमेज
**बार्शी: ७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी जाळ्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ; बार्शी २८ एप्रिल २०२६:  मंडळ, तहसील कार्यालय बार्शी येथील मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) यांनी शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंदणी व लॉक काढण्यासाठी (अनलॉक) तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान पंचांसमक्ष ही मागणी केल्यानंतर आज सापळा कारवाईत त्यांनी ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सोलापूर युनिटने त्यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून नाव नोंद करण्यासाठी दिलेल्या अर्जावर तलाठी यांनी घेतलेल्या नोंदी प्रमाणित करणे व उतारा अनलॉक करण्यासाठी फुलारी यांनी ३,००० रुपये लाच मागितली होती. आज सकाळी पडताळणीच्या वेळी पंचांसमक्ष ही मागणी पुन्हा केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईत आरोपीने स्वतः ही रक्कम स्वीकारली. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ...

**बार्शीत इंदापूरच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेलमधील घटना**

इमेज
**बार्शीत इंदापूरच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेलमधील घटना**  **KDM NEWS बार्शी: (प्रतिनिधी)**बार्शी तालुक्यातील जामगाव शिवार येथील एम.आय.टी. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.         मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी सतीश पाटील रा. वडाळवाडी भिगवण, ता. इंदापूर, ही विद्यार्थिनी एम.आय.टी. कॉलेजच्या हॉस्टेलमधील ब्लॉक नं. ४०१, रूम नं. ६९ मध्ये राहत होती. रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:१९ ते रात्री ८:१५ च्या सुमारास तिने आपल्या खोलीत फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.          ओरडण्याचा आवाज अन् थरार... कॉलेजच्या स्टोअर डिपार्टमेंटमधील कर्मचारी अमित अशोक छपरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हॉस्टेलमध्ये मुलींच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. वैभवीच्या ख...

**जामिनावर सुटलेल्या मनोहर मामाला पुण्यातून अटक; व्यवसाय सुधारण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक**

इमेज
**जामिनावर सुटलेल्या मनोहर मामाला पुण्यातून अटक; व्यवसाय सुधारण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक**  **KDM NEWS प्रतिनिधी कुर्डूवाडी ** कुर्डूवाडी सोलापूर : स्वतःला संत बाळूमामाचा अवतार म्हणवणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात त्याला पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. जामिनावर असतानाही भोंदूगिरी चालू ठेवणाऱ्या मनोहर मामाची ही कारवाई भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या कारवायांवर प्रकाश टाकते.     बाळूमामाचा अवतार सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्णे (किंवा लारसुणे) आहे. डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर ते आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होते. एके दिवशी अचानक गायब झालेल्या मनोहरने काही वर्षांनी परत येऊन दावा केला की, संत बाळूमामा त्यांच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि ते स्वतः बाळूमामाचे अवतार आहेत. करमाळा तालुक्या...