**बार्शी: ७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी जाळ्यात**l

**बार्शी: ७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी जाळ्यात** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ; बार्शी २८ एप्रिल २०२६:  मंडळ, तहसील कार्यालय बार्शी येथील मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) यांनी शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंदणी व लॉक काढण्यासाठी (अनलॉक) तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान पंचांसमक्ष ही मागणी केल्यानंतर आज सापळा कारवाईत त्यांनी ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सोलापूर युनिटने त्यांना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून नाव नोंद करण्यासाठी दिलेल्या अर्जावर तलाठी यांनी घेतलेल्या नोंदी प्रमाणित करणे व उतारा अनलॉक करण्यासाठी फुलारी यांनी ३,००० रुपये लाच मागितली होती. आज सकाळी पडताळणीच्या वेळी पंचांसमक्ष ही मागणी पुन्हा केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईत आरोपीने स्वतः ही रक्कम स्वीकारली.

या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास श्री. रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक, ACB सोलापूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी केले. या कारवाईत पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला, चालक अक्षय श्रीराम यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त/अधीक्षक ACB पुणे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ACB सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी सांगितले की, “कोणत्याही शासकीय कामासाठी कायद्याने निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त लाच मागितली जात असल्यास तात्काळ ACB ला कळवा. आम्ही त्वरित कारवाई करू.”

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल