**बार्शी ;आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित होणार कापशी-सावरगावचे ग्राम महसूल अधिकारी मिलिंद सावंत**

**बार्शी ;आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित होणार कापशी-सावरगावचे ग्राम महसूल अधिकारी मिलिंद सावंत** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : सोलापूर, ३० एप्रिल २०२६ :** महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील कापशी/सावरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी श्री. मिलिंद अशोक सावंत यांना प्रतिष्ठित **आदर्श तलाठी पुरस्कार** जाहीर झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या महसूल आस्थापना शाखेने काढलेल्या पत्रानुसार, श्री. सावंत यांची निवड मागील दहा वर्षांच्या गोपनीय अहवालातील अत्युत्कृष्ट शेर्यांच्या आधारे करण्यात आली. तलाठी म्हणून उत्कृष्ट कामगिरी, कर्तव्यदक्षता आणि सर्व प्रकारची वसुली १०० टक्के पूर्ण करण्याच्या कामगिरीमुळे त्यांची ही निवड झाली आहे.

पुरस्काराचे स्वरूप म्हणून प्रमाणपत्र आणि रु. ५,०००/- (पाच हजार रुपये) चा धनादेश देण्यात येणार आहे. हा पुरस्कार मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, सोहळा **१ मे २०२६ रोजी सकाळी ०७.३० वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय (सोलापूर शहर)** येथे होणार आहे.

श्री. मिलिंद सावंत यांना कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या पत्राची प्रत उपविभागीय अधिकारी सोलापूर, तहसिलदार बार्शी आणि सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेला पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एकाच तलाठ्याची निवड केली जाते. श्री. सावंत यांची ही कामगिरी ग्रामीण महसूल प्रशासनात आदर्श ठरली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**