**बार्शी जिल्हा न्यायालयाने १४ वर्षांनंतर दिलासा: माढा कोर्टातील शिक्षेला दिलासा, आरोपी भैरू डांगे निर्दोष मुक्त**
**बार्शी जिल्हा न्यायालयाने १४ वर्षांनंतर दिलासा: माढा कोर्टातील शिक्षेला दिलासा, आरोपी भैरू डांगे निर्दोष मुक्त** **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळवटे येथे २०१३ मध्ये घडलेल्या मारहाण प्रकरणात माढा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या अपिलावर बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे आरोपीला १४ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. २०१३ रोजी उपळवटे (ता. माढा) येथे सख्ख्या चुलत भावाच्या शेतात जनावरं गेल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यात आरोपी भैरू डांगे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद (क्र. १७३/२०१३) झाला होता. माढा येथील जे.एम.एस.सी. कोर्टाने २०१९ मध्ये आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपी भैरू डांगे यांनी ॲड. गणेश हांडे यांच्या मार्फत बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलात ॲड. हांडे यांनी पुराव्यांच्या कमतरतेचे अनेक मुद्दे उपस्थित केले. यात मुख्य मुद...