**लातूरच्या निलंग्यात सावकारीचा भयावह प्रकार: मित्रासाठी जामीन राहिल्याने दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची पाच एकर जमीन**
**लातूरच्या निलंग्यात सावकारीचा भयावह प्रकार: मित्रासाठी जामीन राहिल्याने दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची पाच एकर जमीन** **KDM NEWS प्रतिनिधी नणंद (लातूर):** मित्राच्या आर्थिक अडचणीमुळे जामीनदार राहणे एका तरुण शेतकऱ्याला चांगलेच भोवले. खासगी सावकाराने अवघ्या दीड लाख रुपयांच्या कर्जासाठी सव्वा कोटी रुपयांची पाच एकर शेती बळकावली. हा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील नणंद गावात उघडकीस आला आहे. पीडिताचे नाव पुंडलिक भोसले आहे. पुंडलिक भोसले यांच्या एका मित्राने चार वर्षांपूर्वी खासगी सावकाराकडून दीड लाख रुपये कर्ज घेतले. पुंडलिक यांनी या कर्जासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली. मित्राने कर्ज वेळेत फेडले नाही. त्यामुळे सावकाराने जामीनदार पुंडलिक यांच्यावर दबाव टाकला. व्याजावर व्याज लावत कर्जाचा डोंगर इतका वाढवला की, पुंडलिक यांना नाईलाजाने आपली पाच एकर शेती (अंदाजे सव्वा कोटी रुपये किंमत) सावकाराच्या नावावर रजिस्टर करून द्यावी लागली. जमीन सावकाराच्या नावावर केल्यानंतरही सावकाराचा तगादा थांबला नाही. त्याने अजून ७० ते ८० लाख रुपये व्याज बाकी अ...