ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय ,?
आजच्या लेखामध्ये आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging information in Marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत असतात. तसेच त्याविषयी इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती मिळत असते. ही माहिती ब्लॉग किंवा वेबसाईट मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते. ही माहिती आर्टिकल स्वरूपात ऑनलाईन पोस्ट केली जाते. अश्याच प्रकारे वेगवेगळ्या विषयांची माहिती आपल्या ब्लॉग मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जातेएखाद्या विषयाची माहिती सोप्या व सविस्तर भाषेत लिहून इंटरनेट च्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवणे ह्यालाच ब्लॉग असे म्हणतात. ब्लॉग हे एका डायरी प्रमाणे आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची माहिती व तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल लिहू शकता.
ब्लॉग चे दोन प्रकार असतात. पर्सनल ब्लॉग (Personal Blog) आणि प्रोफेशनल ब्लॉग (Professional Blog).ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना व जीवनात घडलेल्या अनुभवांना इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग वर प्रसारित करू शकतो. तसेच ह्या मार्फत आपण लोकांना त्याविषयी माहिती देऊ शकतो. जसे उदाहरणासाठी आपण हा ब्लॉग बघूया https://KDMnetwork.Blogspot.com हा ब्लॉग एक Personal ब्लॉग आहे ज्यावर स्वतःचे लेख, कविता पोस्ट करतात.