PPF-सुकन्या समृद्धीबाबत मोठी अपडेट, अर्थ मंत्रालयाच्या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केल्यास...

तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडेच, PPF, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चे नियम अर्थ मंत्रालयाने बदलले आहेत.होय, सरकार 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तुम्हाला आनंदाची बातमी देऊ शकते. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी, आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदरात वाढ केली नाही. आरडी किंवा एफडीवर बँकांकडून दिले जाणारे व्याज सर्वाधिक आहे.

व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा

अशा परिस्थितीत या महिन्याच्या अखेरीस छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

अल्पबचत योजनेवर देण्यात येणाऱ्या व्याजदराचा वित्त मंत्रालयाकडून दर तिमाहीत आढावा घेतला जातो. जूननंतर आता हा आढावा सप्टेंबरअखेर होणार आहे.

तत्पूर्वी, 30 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत काही अल्पबचत योजनेच्या (एसएसवाय) व्याजदरातही (Interest Rate) वाढ करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल-जून 2023 या कालावधीसाठीही दर वाढवण्यात आले होते.आरडीचे व्याजदरही वाढले

दरम्यान, 30 जून रोजी केलेल्या बदलामध्ये, सरकारने एक वर्ष आणि दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीचे दर अनुक्रमे 10 बेस पॉइंट्स (BPS) ने वाढवून 6.9% आणि 7.0% केले.

याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या (Post Office) 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीच्या व्याजदरात 30 bps ने वाढ करण्यात आली आहे. यानंतर, आरडीवरील व्याजदर 6.5% पर्यंत वाढला. याशिवाय इतर योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.तसेच, 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीपासून 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत लघु बचत योजनेचा व्याजदर सलग 9 महिने समान पातळीवर राहिला. आता गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून बदल करण्यात येत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी सरकारकडून पीपीएफच्या व्याजदरात वाढ होऊ शकते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल