मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ओबीसी आरक्षणासाठी कुणबी समाज करणार आंदोलन'

बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत.खेड : कुणबी समाजाच्या समस्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असून, जातनिहाय जनगणना व ओबीसी आरक्षण  बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत, अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे यांनी दिली.नवभारत हायस्कूल सभागृहात कुणबी समाजाच्या सभेत ते बोलत होते. या वेळी कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम, समाजनेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, शाखा खेड तालुका मुंबईचे अध्यक्ष शंकर बाईत, कृष्णा आगरे, दीपक शिगवण, सचिन गोवळकर, ॲड. डफळे, समाजोन्नती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृह इमारती लोकार्पण सोहळासंदर्भात चर्चा करण्यात आली. ओबीसी जातीनिहाय जनगणना व ओबीसी सामाजिक व राजकीय आरक्षण बचाव करणे, तिल्लोरी कुणबी समाजाची माहिती जमा करून मागासवर्ग आयोगाला सादर करण्याविषयी नियोजन व खेड तालुक्यातील कुणबी सांस्कृतिक भवनासाठी शासकीय जागा या विषयांवर चर्चा झाली.खेड तालुक्यातील सर्व कुणबी समाज हा आपल्या मातृसंघटनेच्या पाठीशी आहे. ज्या ज्या वेळी संघाध्यक्ष कुणबी समाजाला जातनिहाय जनगणना, ओबीसीच्या आरक्षणासाठी व कुणबी समाजाच्या प्रश्नांवर एकत्र येण्यास सांगेल त्या वेळी सगळा समाज आपल्यासोबत असेल, असे आश्वासन शंकर बाईत यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**