महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर...' अजित पवार गटाचे आमदार भुजबळांच्या पाठीशी पण वरिष्ठांकडून देण्यात आल्या खास सूचना

आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण पेटलं आहे. मराठा आंदोलक आणि राज्यातील काही नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांचे सत्र सुरू आहे. अशातच काल(मंगळवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरीवरील कालच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी आमदारांना दिल्याची माहिती आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, हीच आपलीही भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये होणाऱ्या शिबीरासाठी सर्व नेत्यांना हजर राहण्याच्या वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे.दरम्यान, या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. भुजबळांना थ्रोट इंफेक्शन झाल्यामुळे ते संपूर्ण बैठकीत तोंडावर मास्क लावून बसले होते. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.देवगिरीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत मनोज जरांगेच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीत गावबंदीबाबत आमदारांनी निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांना उद्देशून केलेल्या महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? या भुजबळांच्या वक्तव्याला आमदारांनी समर्थन दिलं आहे. आमदारांनी मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबाबत जपून बोलावे, अशा सूचना वरिष्ठांकडून आमदारांना देण्यात आल्या आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल