'हार मानायची नाय'; मनोज जरांगे पाटील 'या' तारखेला जाहीर करणार पुढची भूमिका

अंतरवाली सराटी याठिकाणी राज्यभरातल्या सकल मराठा समाजाची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. 24 डिसेंबरनंतर काय भूमिका घ्यायची याविषयी चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील यांनी ही बैठक बोलावली होती..मराठा आरक्षण  प्रश्नी मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी बैठक झाली. या बैठकीत राज्यभरातील मराठा आरक्षण चळवळीत काम करणारे, स्वयंसेवक, उपोषणकर्ते आणि सभेचे नियोजन करणारे मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी हार मानायची नसून आता केवळ गुलालच घ्यायचा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत. आतापर्यंत राज्यभरात 54 लाख मराठ्यांकडे कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहितीही जरांगे यांनी दिलीये.

23 तारखेला भूमिका जाहीर करणार : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. मात्र, 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काय करायचं याविषयी चर्चा झाली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकार काय करत आहे याची माहिती जरांगे यांना देण्यात आलीये. त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांचाही फोन येवून गेला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात माहिती देणार आहेत. त्यामुळं आजचा निर्णय हा येत्या 23 तारखेला होणाऱया बीड येथील 'इशारा सभेत' जाहीर करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल