शेअर्स मार्केट मधून मोठा परत देतो म्हणून फसवणूक...

बार्शी; प्रतिनिधी;
सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या अमिशापोटी सुशिक्षित असो वा अडाणी फसणारा ची काही कमी नाही बार्शीतील बातमी सविस्तर

एका महिलेनी पुण्याच्या नातेवाइकांमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असे सांगून १४ लाख २० हजारांची फसवणूक केली, याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनीता विश्वनाथ कोकाटे (वय ४०, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांच्या फिर्यादीवरून सुलताना निजाम शेख रा. ताडसौंदने रोड, 

बार्शी व पुणे येथील साथीदारावर गन्हा दाखल केला आहे दाखल
केलेल्या तक्रारीत सुलताना शेख हिची सुनीता कोकाटे यांची २०१६ साली ओळख झाली.

जानेवारी २०२३ मध्ये सुलताना व तिची आई यांनी घरी येऊन पुण्याचा आमचा जवळचा नातेवाईक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तीन महिन्यात दुपटीने पैसे कमवितो, त्यामुळे तूही गुंतविल्यास सहा महिन्यांत दामदुप्पट परत देतो. त्या मोबदल्यात मला मला ५० टक्के परत दे असे सांगून विश्वास निर्माण केला.

त्यानंतर सुनीता कोकाटे व त्यांच्या पतीने जमीन विकीस काढन सौदा

करून व प्लॉट विकून, मुलाची विम्याची आलेले ७ लाख रु. असे सुलताना शेख हिच्या बैंक अकाउंटवर पाठविले.

दामदुपटीने पैसे मिळणार म्हणून ११ लाख दिले होते, त्यानंतर सुलताना हिने फिर्यादीच्या घरी येऊन ८० ग्रॅमच्या सौन्याच्या पाटल्या, सोन्याचे गंठन असे ३ लाख २० हजारांचे दागिने घेऊन गेली. असे एकूण १४ लाख २० हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल