जरांगेंच्या मुंबईतील उपोषणासाठी 'या' मैदानची निवड? शिष्टमंडळानं घेतला आढावा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याच्या पाहणीसाठी जरांगेंच्या शिष्टमंडळानं मुंबईत जाऊन पाहाणी केली. या पाहणीनंतर ज्या तीन मैदानांचा पर्याय होता त्यांपैकी आझाद मैदान हेच ठिकाण उपोषणासाठी योग्य असल्यानं त्यालाच पसंती असल्याची माहिती कळते आहे.तीन मैदानांचा पर्याय

शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी मैदान या तीनपैकी एक ठिकाण मुंबईतल्या आंदोलनासाठी विचाराधीन आहे. या तिन्ही मैदानांची पाहाणी शिष्टमंडळाकडून केली जात आहे. यांपैकी दादर येथील शिवाजी पार्क मैदान, यानंतर आझाद मैदान तर बीकेसी मैदानाची पाहणी करण्यात आली. यांपैकी या शिष्टमंडळा शिवाजी पार्क आणि बीकेसीपेक्षा आझाद मैदानचं उपोषणासाठी आणि सहभागी आंदोलकांसाठी जास्त सोयीचं असल्याची चर्चा आहे.अंतिम निर्णय जरांगे घेणार

दरम्यान, या सभास्थळांची संपूर्ण पाहाणी केल्यानंतर हे शिष्टमंडळ आंतरावाली सराटीला जाऊन पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडून मग यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे....तर जरांगे उपोषणावर ठाम

मनोज जरांगे हे २० जानेवारी रोजी मुंबईतील उपोषणावर ठाम आहेत. तर दुसरीकडं सरकारनं त्यांना थोडा संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पण सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईत लाखो-करोडो संख्येनं मराठा समाज दाखल होईल, यासाठी आंदोलकांच्या सोयी-सुविधांची काळजी सरकारनं घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल