12वी शिकलेले भाडेकरू, दिवसभर घरी असायची लोकांची ये-जा; पोलिसांनी धाड टाकताच...

भाडेकरूंनी भाड्याने खोली घेतली. पण ते काही काम करत नव्हते. पण त्यांच्याकडे कामानिमित्त अनेकजण येत होते. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या खोलीवर धाड टाकली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.जयपूरच्या विद्याधर नगर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना अटक केलं. या चारही जणांकडे हायटेक मॉडीफाइड कम्प्युटर सिस्टिम, लॅपटॉप, राउटर, दोन हेडफोन, २ इयरबड, ३ आयफोन, इतर स्मार्टफोन, ७ डेबिट, क्रेडिट कार्ड, २ कोटींहून जास्त लोकांचा सोशल मीडिया युजरनेम-पासवर्डसह आधार कार्ड डेटाही आढळला आहे.

डीसीपी नॉर्थ राशी डोगरा यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या चार जणांनी कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करून पैसे कमावले आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेले चौघेही फक्त १२ वी पास आहेत. त्यांनी बिहार, तेलंगना, जाममताडा इथं सायबर गुन्हेगारांशी संपर्क करून हॅकिंग शिकले. त्यानमंतर सायबर टेक्नॉलॉजी एक्सपर्ट बनले आणि सायबर फसवणूक सुरू केली. युट्यूबवर हॅकिंगचे व्हिडीओ पाहून हॅकिंग शिकले.

वेगवेगळ्या एप्सच्या माध्यमातून स्वत:चं ऑनलाइन लोकेशन बाऊन्स करत होते. त्यामुळे त्यांचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं. वेगवेगळ्या वेबसाइटवर आणि एप्सला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने क्रॅक करून डाटा चोरला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती काढली होती. चौघांनी चौकशीत जवळपास १५ कोटी लोकांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा सीव्हीव्हीसह सेव्ह असल्याचं सांगितलं.विद्याधर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ते एका खोलीत भाड्याने राहत होते. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली होती की इथं राहणारे तरुण काही काम करत नाहीत पण त्यांच्या घरी काही दिवसात ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते. काय काम करतात, कोण आहेत? याची माहिती कोणालाही नाही. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर १० दिवस पोलिसांनी रेकी केली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत चौघांना अटक केली. त्यांच्याजवळ आढळलेल्या साहित्यावरून ते सायबर गुन्हेगारी करत असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी अटक केलेल्या चौघांची चोकशी केली. त्यातून असं समोर आलं की, डिसकोर्ड एपच्या माध्यमातून ऑनलाइन शेअर करून फसवणूक करत होते. यातून मिळालेले पैसे वेगवेगळ्या पद्धतीने खात्यांमध्ये ट्रान्सफर करायचे. डेबिट, क्रेडिट कार्डवरून लुटलेले पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवायचे. सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल