'शिवसेनाप्रमुखाला कुठल्याही नेत्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही'
भूकंप होणार का? मुख्यमंत्री बदल होणार का? नवीन समीकरण आकाराला येणार का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मिळू लागली आहे.निकाल वाचनात राहुल नार्वेकर यांनी नोंदवलेली महत्त्वाची निरीक्षणनिवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी (शिवसेनेतील दोन गट) जे संविधान सोपवलं, त्यावर त्यांच्यात एकमत नाहीय. पक्षातील नेतृत्वाची जी रचना आहे, त्यावेळी दोन्ही गटांचा वेगवेगळा दृष्टीकोन आहे.
– विधानमंडळातीलल बहुमत हा महत्त्वाचा पैलू आहे. वाद होण्याआधी नेतृत्वाची जी रचना होती, ती लक्षात घेऊन योग्य संविधान कुठलं? हा निर्णय मला घ्यायचा आहे.
– रेकॉर्ड्सनुसार, 1999 सालच्या शिवसेनेच्या संविधानाला मी वैध मानतो.
– कुठला गट खरा राजकीय पक्ष आहे, ते ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे संविधान स्वीकारलय तेच योग्य आहे असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलय.
– शिंदे गटाने 1999 सालच पक्षाच संविधान दिलं होतं, त्याला विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवलय. 2018 सालच संविधान वैध ठरवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावलीय.
– 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट अस्तित्वात आले. 22 जून 2022 रोजी हे विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आलं.निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर 27 फेब्रुवारी 2018 रोजीच शिवसेना नेतृत्वाच्या रचनेसंदर्भातील एक पत्र आहे. माझ्या मते त्यातून शिवसेना नेतृत्वाची रचना दिसून येते. कुठला गट खरी शिवसेना हे ठरवण्यासाठी हे पत्र महत्त्वाच आहे.
– दोन गट जन्माला येण्याआधी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे 1999 सालच पक्षाच संविधान सोपवलं होतं.
– शिवसेनाप्रमुखाला कुठल्याही नेत्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही.