ग्रामसेवकास 5000 ची लाच घेताना अँटी करप्शन च्या जाळ्यात...

लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होतानाच दिसते, वडिलोपार्जित घराच्या वारस नोंदीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजार (५०००)रुपयांची लाच घेताना वरसगाव ( ता.वेल्हे, राजगड)चे ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे ( वय ४४, रा. वरसगाव ) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.हा प्रकार परवा बुधवारी ( ता. २७) बुधवार रोजी पुण्यातील राजाराम पुला जवळील कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमा जवळ घडला आहे. या ठिकाणी  तक्रारदार शेतकरी यांचे वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्ती  करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी रीतसर ग्रामपंचायतीत अर्ज दाखल केला होता.

त्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल घाडगे यानी तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितली होती. पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे याला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण या तपास करीत आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल