तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार !महिलेला पोलिस कोठडी...
प्रेमविवाह केल्यानंतर पतीने पत्नीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पत्नीने धक्कादायक कृत्य केलं आहे. शारीरिक संबंधाला नकार देताच पत्नीने पतीचं गुप्तांग कापल्याची घटना बार्शीत समोर आली आहे.तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. तर या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून एका महिलेने तरुणाला लॉजवर नेऊन शरीर संबंध ठेवण्यास लावले. यासाठी तरुण तयार नसतानाही बळजबरीने त्याला विवस्त्र करून गुप्तांगावर चाकूने वार करून जखमी केलं. तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमलेश काकासाहेब सांगळे (वय २४ रा. शिरूर घाट ता. केज जि. बीड) याचे मोबाइलचे दुकान होते. या दुकानात महिला कामानिमित्त आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आधीपासून विवाहित असलेल्या महिलेने तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सांगळे याने नकार दिल्यानंतर ब्लॅकमेल केलं. महिलेने मार्च २०२३ मध्ये तरुणावर शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणी त्याला अटकही झाली. दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही ती त्रास देत होती. शेवटी तरुणाने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्यासोबत आळंदीत विवाह केला.लग्नानंतरही महिला तरुणासोबत राहत नव्हती. मात्र ती त्याला फोन करून आणि दुकानात जाऊन त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून तरुण ३ महिन्यांपूर्वी बार्शी तालुक्यात नातेवाइकाकडे राहण्यास गेला. पण त्यानंतर गुरुवारी २१ मार्च रोजी पहाटे ५ वाजता तिने समाज माध्यमावरील कमलेशच्या अकाउंटवरून फोन केला. त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही तेथीलच एका लॉजवर गेले. लॉजवर तिने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने नकार दिला. तरीही कमलेशचे कपडे काढत त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. या प्रकरणी महिलेला अटक केली असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे