ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला

जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील ७०० पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत रविवारी, १७ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड.आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

जोगेश्वरी पूर्व उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, माजी विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, महिला विभाग अध्यक्षा सायली जाधव, विभाग सचिव विलास म्हेतर, उपविभाग अध्यक्ष मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, महिला उपविभागध्यक्षा कामिनी दळवी, श्रद्धा सागवेकर, शाखाध्यक्ष रमाकांत नर, अमोल पारधी, कुणाल गावडे, किशोर पुंडे, राजेश जाधव, आकाश पाटील असे एकूण ७०० पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानत पक्षाच्या आंदोलनात आक्रमकपणे भाग घेतला. पण पक्षांमध्ये काही लोकांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे माझ्यासारखा कर्मठ निष्ठावान कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रवीण मर्गज यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**