माढा मतदारसंघासाठी शरद पवार यांची शांत व संयमी भूमिका...

सोलापूर ; गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत शरद पवार यांच्या हातून घड्याळ चिन्ह गेले. मतदारसंघात ज्यांना मोठे केले, ते पण सोडून गेले. एकही आमदार वा माजी आमदार आज सोबत नाही, अशी कागदोपत्री स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. मतदारसंघात 'माढा आणि शरद पवारांना पाडा' घोषणेचा उगम झाला, २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल प्रचंड रोष होत; आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसत आहे. माढ्याच्या बाबतीत शरद पवार आजही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत. येथे गुलाल उधळण्याची संधी आहे पण उमेदवार योग्य पाहिजे, हा जनमानसाचा अंदाज पवारांपर्यंत नक्कीच गेलेला असावा, त्यामुळे माढ्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्चित होण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील स्वत:ची उमेदवारी असो की, २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व २०१९ मध्ये संजय शिंदे यांची उमेदवारी, उमेदवारी देताना शरद पवार कुठपर्यंत अंत पाहतात, किती जणांचा कशा, कशा पद्धतीने अंत पाहतात ? याचा चांगलाच अनुभव मोहिते-पाटील व शिंदे बंधू या दोघांनाही आहे. त्यामुळे माढ्याच्या बाबतीत शरद पवार तुर्तास घाई करण्याची शक्यता कमीच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सध्या धैर्यशील मोहिते-पाटील व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातीलच असणार, हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल