अभिजीत बिचकुले साताऱ्यातून निवडणूक लढविणार लोकसभेची

साताऱ्यातून अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लोकसभेची रणधुमाळी उडणार या चर्चा तर आहेतच. पण यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आणि ते नाव म्हणजे अभिजीत बिचुकले.

आपण साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्वतः म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातारा जिल्ह्यामधील आहेत. याच साताऱ्यातून अभिजीत बिचुकले आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या विषयी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणतात की,

“लोकांनी मला मतदान करावं मी नक्कीच विकास करेन. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. माझ्याकडेच अनेक लोक येणार आहे. मी कुठेही गेलो तरी अनेक लोक माझ्याजवळ येऊन फोटो, सेल्फी काढतात .मात्र मतदान का करत नाही हा प्रश्न मलाही पडतोय.’ असं ते म्हणाले.

दरम्यान, कसब्याच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाची चर्चा सुरु होती. त्यावेळेस दुसरीकडे अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळाली? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण होते. कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना तब्बल 47 मते मिळाली होती.

तरीही त्यांच्या आत्मविश्वासात कसुभरही कमतरता आली नाही. आणि आता ते पुन्हा सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळणार हे पाहणं खरचं उत्सुकतेच असणार आहे.

अभिजीत बीचुकले आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता डॉक्टर अभिजीत बीचुकले झाले आहेत. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट काम करण्यात आली आहे. त्याच आनंदात त्यांनी निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीये. ।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल