६० टक्के मुलांना डिजिटल व्यसनाचा धोका ?

     डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी त्याचा वाईट परिणाम होण्याचे धोकेही निर्माण होण्याची शक्यता आहे. एका नवीन सर्वेक्षणामध्ये ५ ते १६ वर्षे वयोगटातील सुमारे ६० टक्के मुलांमध्ये संभाव्य डिजिटल व्यसनाचे संकेत देणारी वर्तणूक दिसण्यात आली. डिजिटल व्यसनाचा हा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी धोरण लवकर राबवण्याची गरज या सर्वेक्षणामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. एका कंपनीने एक हजार पालकांच्या आधारावर असे सर्वेक्षण केले आहे.

मोबाईल वापरावर जास्त वेळ घालवण्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, शारीरिक हालचाली कमी करणे, सामाजिक अंतर कमी होणे आणि शैक्षणिक कामगिरीतीळ घसरण यासह विविध धोके कसे उद्भवतात, हे अधोरेखित करणे हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. या

सर्वेक्षणात जवळपास ६० टक्के मुले संभाव्य डिजिटल व्यसनाचे सूचक वर्तन दर्शवतात आणि जवळ जवळ ८५ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन सामग्रीचा वापर व्यवस्थापित करण्यात अडचण येत असल्याचे मान्य केले.

या सर्वेक्षणात मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर व्यतीत करत असून, जवळपास ७० ते ८० टक्के मुले दररोज शिफारस केलेल्या वेळेच्या मर्यादा ओलांडत आहेत, हे अधोरेखित केले आहे. गेमिंग आणि सोशल मीडियावर ही मुले जास्तीत जास्त वेळ खर्च करत असल्याचे दिसून आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**