चैत्री पौर्णिमा यात्रा येरमाळा 24 पासून प्रारंभ , 24 पासून चुना वेचानार
शिराळा माहेर असलेली तुळजाभवानी मातेची थोरली बहीण येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेतला 24 एप्रिल ला चुना वेचायचायं..
येरमाळ्यात श्रावणी पौर्णिमेला आणि चैत्र पोर्णिमेला आशा वर्षातून दोन वेळेस श्री येडेश्वरी देवीची यात्रा भरते ,त्या अनुषंगाने श्री येडेश्वरी देवीचा अल्पसा परिचय
चैत्र महिन्यात भरणारी राज्यातील सर्वात मोठी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची यात्रा आहे ही यात्रा चैत्र महिन्यात चैत्र पोर्णिमे पासून पाच दिवस असते गावच्या दक्षिणेकडील पश्चिम बाजूस असलेल्या आंबराईत साधारणता 50 एकर जागेत ही यात्रा भरते येरमळयाची यात्रा ही दोन चमत्कारामुळे प्रसिद्ध आहे एक म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाला कवड्या येत होत्या आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये चुण्याच्या शेतात श्री येडेश्वरी देवी च्या पालखीचे आगमन होताच तिथील शेतात आपोआप चुनखडीचे खडे प्रगट होतात आज ही हे खडे चुन्याच्या शेतात प्रगट होतात या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक चुना वेचण्यासाठी येरमाळा येथील चुन्याच्या शेतात दाखल होतात ...आणि इथूनच यात्रेला सुरुवात होते .... ही यात्रा पाच दिवस असते
यात्रेला आलेला प्रत्येक भक्त चुण्याच्या शेतात जाऊन चुनखडीचे पाच पाच खडे वेचून देवीच्या पालखीवर उधळून पालखीस नैवेघ दाखवतात शेवटी सहाव्या दिवशी दुपारी 3 वाजता घुगरी प्रसादाचा कार्यक्रमानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिरात [ डोंगरावर ] असंख्य भाविकांच्या समवेत 6 वाजता वाजत-गाजत श्री येडेश्वरी देवी च्या पालखीचे प्रस्थान होते , देवीचे पुजारी आष्टमी दिवसी जमा झालेल्या ,चुनखडीची भट्टी लावतात आणि याच चुण्याने पुजारी व सर्व गावकरी मिळून मंदिर सारवतात [ रंग देतात ] आजही ही प्रथा चालूच आहे श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरास चुण्याच्या रंग दिला जातो म्हणून येरमळयात एका ही घरास चुण्याचा रंग लावत नाहीत ...
येडेश्वरी देवीचे मंदिर नेमके कोणत्या काळात बांधले गेले याबाबत विद्वानांमध्ये एकमत जरी नसले तरी , बांधकामासाठी केलेल्या शिळेच्या वापरावरून आणि मंदिराची हेमाडपंती बांधणी आणि मंदिरासमोरच्या दीपमालांची उभारणी यावरून मंदिराच्या प्राचीनतेची कल्पना येऊ शकते तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची थोरली बहीण हीच ..." श्री येडेश्वरी देवी आहे "
याशिवाय येडेश्वरी मंदिर ट्रस्टकडे असलेल्या इसवीसन 1600 साल ची 7 एकर इनामी जमीन च्या दस्त ऐवजा वरून मंदिराचे पुरातन तत्त्व लक्षात येते.
येडेश्वरी देवीची, ओळख म्हणजे तिला येडाई का म्हणतात ..
रावणाने जेव्हा सीता मातेचे अपहरण केल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामातेला शोधायला येरमाळा मार्गे जात असताना आजच्या येडेश्वरी देवीच्या डोंगरावर पार्वती मातेने प्रभू रामचंद्रांची सीता भक्ती ची परीक्षा घेण्याच्या हेतूने सीतेचे रूप धारण करून प्रभू रामचंद्रांना फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले व ते म्हणाले वेडी आहेस तू अर्थात.....
[ येडेश्वरी आहेस ] तेव्हापासून या देवीस येडाई म्हणतात आणि येडेश्वरी च्या डोंगरास येडाई चा डोंगर म्हणून ओळखतात....
श्री येडेश्वरी देवीचे माहेर...
श्री येडेश्वरी देवीचे माहेर बार्शी तालुक्यातील शिराळा हे गाव असल्याचे सांगितले जाते पूर्वी काळी जेव्हा बऱ्याचदा श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराचे वातावरण उदास दिसायचे तेव्हा श्री येडेश्वरी देवी रुसून माहेरी गेली असे समजले जात...
तेव्हा देवीला माहेरहून परत आणण्यासाठी आसपासच्या गावातील देवीचे मानकरी एकत्र येऊन एक घोड्याचे शिंगरू येडेश्वरी देवीच्या देवळातून मोकळे सोडायचे ते सरळ पळत सुटायचे आणि ते थेट शिराळा येथील असलेल्या मंदिरा जवळ जाऊन थांबायचे बरोबर गेलेले मानकरी शिराळा गावच्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन तिथे त्यांना जेवन दिल्यानंतर ते घोड्याचे शिंगरू येरमाळा येथे येऊन श्री येडेश्वरी देवीच्या मूर्तीजवळ जाऊन थांबायचे जोपर्यंत शिंगरू तेथून जात नसे तोपर्यंत लोक त्याला हात लावत नव्हते अशी याबाबतची अख्यायिका सांगितली जाते...
श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराचा परिसर...
श्री येडेश्वरी देवीचे मंदिर हे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे मंदिराजवळ जाण्याकरिता डांबरी रस्ता करण्यात आलेला आहे मंदिराच्या पायथ्याशी भव्य तीर्थकुंड आहे तेथील पाणी गोड व पाचक आहे या तीर्थाच्या पाण्याने स्नान केल्यास चर्म रोग बरा होतो अशी धारणा आहे कुंडाजवळच एक मुखी दत्त मंदिर ही आहे मंदिराच्या चोहोबाजूने दीपमाळा आहेत श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरावर 200 ते 300 दगडी पायऱ्या चढून जावे लागते पुर्वेकडून प्रवेशद्वार आणि पश्चिमेस बाहेर जाण्याचा मार्ग आहे श्री येडेश्वरी देवीचा तांदळा स्वयंभू पाषाणाचा असून तेजस्वी डोळे भव्य कपाळावर कुंकुम तिलक शेंदूर लेप केलेला आहे जवळच परशुरामाची चांदीची मूर्ती आहे श्री येडेश्वरी देवीची सकाळ संध्याकाळ दररोज दोन वेळा महापूजा केली जाते येरमाळ्यात श्रावणी पौर्णिमेला आणि चैत्र पोर्णिमेला आशा वर्षातून दोन वेळेस श्री येडेश्वरी देवीची यात्रा भरते.