बार्शी बस स्थानकातील वर्कशॉप मध्ये दुर्दैवी घटना!

KDM NEWS बार्शी:- प्रतिनिधी दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी अंदाजे ९ च्या दरम्यान बार्शी बस स्थानकातील गॅरेज मध्ये एका हृदयद्रावक घटना घडली त्यामध्ये वाहक सतीश इंगळे मुक्काम पोस्ट येडशी तालुका जिल्हा धाराशिव नावाचा बसवाहक जागीच ठार झाला.

धाराशिव (उस्मानाबाद)जिल्ह्यातील येडशी येथील रहिवासी असलेले वाहक सतीश इंगळे हे पाठीमागे असलेल्या आरोमध्ये पाणी नेण्यासाठी आले असता बस वर्कशॉप मध्ये दुरुस्ती झाल्यानंतर रॅम्पवरून बस बाहेर काढत असताना, इंगळे यांना अचानक धक्का लागून ते सरळ बसच्या चाकाखाली गेले . या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेने बस स्थानकात शोककळा पसरली होती. या अपघातासाठी डेपो मॅनेजरच्या हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. या अगोदरही अशा घटना घडल्या आहेत यातून काही धडा घेतलेला नाही.
चालक जेव्हा बस पाठीमाग घेतो तेव्हा वाहक हजर नसतो का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत?
बस वर्कशॉप मधून ( रॅम्प वरून) पाठीमागे घेतील घेताना कुठल्या सूचना दिल्या जात नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे आणि डेपो मॅनेजरवर काय कारवाई होते हे लवकरच स्पष्ट होईल.

बस पाठीमागे घेताना सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का?
या हृदयद्रावक अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वाहकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अधिक माहिती घेण्यासाठी व पूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी तेथील मॅडम व डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी KDM NEWS प्रतिनिधी शी माहिती देण्यास नकार दिला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल