पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शश्रुत हॉस्पिटल अनाधिकृत बांधकाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हॉस्पिटल...

इमेज
#सुश्रुत हॉस्पिटलमध्ये #अनधिकृत बांधकाम;बार्शी नगरपालिकेला आली #पोलीस #स्थानकात जाऊन गुन्हा नोंद करण्याची वेळ ... KDM NEWS बार्शी प्रतिनिधी :- सुश्रुत #हॉस्पिटलमधील तळमजल्यावर असलेल्या पार्किंगच्या जागेत #अनधिकृत बांधकाम करुन, त्याचा विनापरवाना वापर #मेडिकल #दुकान व ओपीडी करिता होत असल्याचे निदर्शानास #आल्यामुळे नगरपरिषदेने हॉस्पिटल ला नोटीस दिली होती. तरीही बांधकाम काढून घेतले नाही त्यामुळे बार्शी #नगरपरिषदेने डॉ. संजय अंधारे यांचेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप चतुर्भुज सुतार, रा. बार्शी यांनी ५ जून २०२३ पासून डॉ. संजय अंधारे यांच्या #सुश्रुत हॉस्पिटलमधील अनधिकृत बांधकामाविषयी बार्शी नगरपरिषदेकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या. त्यानुसार नगरपरिषदेने सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याठिकाणी २१.२३ मीटर बाय ९.०५ मीटर मापाचे आरसीसी बांधकाम करुन त्याचा #विनापरवाना वापर मेडिकल दुकान व ओपीडी करिता सुरु केल्याचे दिसून आले. त्यावर नगरपरिषदेने ३ ऑगस्ट २०२३ रोजी सदर बांधकाम ३० दिवसात काढून घेण्याची नोटीस बजावली होती.  तरीही #...

सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण

इमेज
सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय बार्शी येथे दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी-विशेष मोहिम शिबीराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहज व सुलभ सुविधा प्रदान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि शिबिराच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  साथीच, बार्शी शहरातील गाडेगाव रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना दिले. आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले.  यावेळी तहसीलदार एफ.आर. शेख, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा प...

कोलकत्ता येथील अर्जी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि खून या घटनेचा सर्व स्तरातून होत आहे निषेध..

कोलकाता येथील के आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तेवढ्याच क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर आता पीडितेच्या वडिलांचं दुःख समोर आलं आहे. माझी मुलगी ओपीडीमध्ये काम करत होती. पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत कुणीही तिला बोलवलं नाही किंवा कुणीही ती कुठे आहे हे बघायलाही गेलं नाही याचं मला खरंच आश्चर्य वाटतं आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. वडिलांनी केलेल्या या दाव्यामुळे मेडिकल कॉलेजवर प्रश्न उपस्थित आहेत. कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 खुलासे  1) असामान्य लैंगिकता आणि जननेंद्रियाच्या छळामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या खाजगी भागावर खोल जखमा आढळल्या.  २) आरडाओरडा थांबवण्यासाठी नाक, तोंड आणि घसा सतत दाबला गेला, गळा दाबल्यामुळे थायरॉईड कूर्चा तुटला.  ३) ओरडू नये म्हणून डोके भिंतीवर दाबले, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमा आढळल्या.  4) एवढ्या जोरात हल्ला केला की चष्म्याचे तुकडे डोळ्यात घुसले, दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव ...

कार्यक्रमाला हजर राहिल्या नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द करणार ?; सुप्रिया सुळे

इमेज
महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे. आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.लाभार्थी बहि‍णींना या कार्यक्रमाला आणले जाणार असू लाभार्थी महिलांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी केलेली असतानाच एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवर हा मेसेज पोस्ट केला आहे. काय आहे मेसेजमध्ये? खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सॲप मेसेज एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या मेसेजमध्ये लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे अर्ज रद्द केले जातील, असे या मेसेजमध्ये लिहिलेले आहे. या मेसेजनंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, '...

बदलापूर जे घडलंय ते घृणास्पद आहेच, पण शाळेवर राग काढू नका, अध्यक्षांचा कंठ दाटून आला

इमेज
बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेमुळे सध्या बदलापूर शहरातील वातावरण अक्षरश: पेटले आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात अक्षम्य चालढकल केल्याने नागरिक आणि पालक कमालीचे संतापले आहेत.मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला. तर दुसरीकडे आंदोलकांचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसला आहे. काहीवेळापूर्वीच बदलापूर स्थानकात आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली होती. तर दुसरीकडे शाळेबाहेरील आंदोलकांनी पोलीस सुरक्षेचे कडे भेदत शाळेच्या आतमध्ये शिरत तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टळला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच शाळेचे अध्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर आले. मात्र, शाळेत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना शाळेचे अध्यक्ष भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती ...

17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ....

इमेज
17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ....         मुंबई : राज्यातील 17 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत 11 अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.  बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी (List Of IPS Officer Transfer)  अतुल कुलकर्णी - पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण १ श्रीकृष्ण कोकाटे - पोलीस अधीक्षक, हिंगोली सुधाकर बी. पठारे - पोलीस अधीक्षक, सातारा अनुराग जैन -  पोलीस अधीक्षक, वर्धा विश्व पानसरे - पोलीस अधीक्षक, बुलढाणा शिरीष सरदेशपांडे - पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे संजय वाय. जाधव -  पोलीस अधीक्षक, धाराशीव कुमार चिता - पोलीस अधीक्षक, यवतमाळ आंचल दलाल - समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे नंदकुमार ठाकूर - प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड निलेश तांबे - प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर पवन बनस...

नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणाऱ्या या वास्तुंची बांधणी

नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणाऱ्या या वास्तुंची बांधणी देखील स्वतः छत्रपती शाहु महाराजांच्या पुढाकारानेच झाली. याच कालावधीत संगीत आणि नाटयकलेची बीजेदेखील कोल्हापुरात रुजली. यांच सारं श्रेय जात पॅलेस थिएटरला..... अर्थात आजच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला.               रोम भेटीवरून परतल्यानंतर तिथे असलेले ऑलिंपिक मैदान व त्याला लागुनच असलेल नाटयगृह यांची प्रेरणा घेऊन छत्रपती शाहु महाराजांनी या वास्तु उभारल्या. सन 1913 ते 1915 या कालावधीत बांधल्या गेलेल्या या नाट्यगृहाचा रंगमंच 20 फुट बाय 34 फुट इतका प्रशस्त असून रंगमंचा खाली आवाज घुमण्यासाठी पाण्याने भरलेला 10 फुट खोल खड्डा आहे. पाणी खेळते राहण्यासाठी पक्की गंटारी बांधली आहेत. नाटयगृहास कोठेही खांब नाहीत. कुठेही बसले तरी नाटक व्यवस्थित दिसावे व स्पष्ट आवाज ऐकु यावा अशी रचना केलेली आहे. नाट्यगृह आखीव, रेखीव व राजेशाही थाटाचे असुन त्या काळी राजघराण्यातील स्त्रियांना नाटक पाहता        यावे म्हणून बाल्कनीमध्ये दोन बंदिस्त खोल्यांची विशेष रचना करण्यात आलेली आहे.      ...