शश्रुत हॉस्पिटल अनाधिकृत बांधकाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हॉस्पिटल...
#सुश्रुत हॉस्पिटलमध्ये #अनधिकृत बांधकाम;बार्शी नगरपालिकेला आली #पोलीस #स्थानकात जाऊन गुन्हा नोंद करण्याची वेळ ...
KDM NEWS बार्शी प्रतिनिधी :- सुश्रुत #हॉस्पिटलमधील तळमजल्यावर असलेल्या पार्किंगच्या जागेत #अनधिकृत बांधकाम करुन, त्याचा विनापरवाना वापर #मेडिकल #दुकान व ओपीडी करिता होत असल्याचे निदर्शानास #आल्यामुळे नगरपरिषदेने हॉस्पिटल ला नोटीस दिली होती. तरीही बांधकाम काढून घेतले नाही त्यामुळे बार्शी #नगरपरिषदेने डॉ. संजय अंधारे यांचेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप चतुर्भुज सुतार, रा. बार्शी यांनी ५ जून २०२३ पासून डॉ. संजय अंधारे यांच्या #सुश्रुत हॉस्पिटलमधील अनधिकृत बांधकामाविषयी बार्शी नगरपरिषदेकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या. त्यानुसार नगरपरिषदेने सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याठिकाणी २१.२३ मीटर बाय ९.०५ मीटर मापाचे आरसीसी बांधकाम करुन त्याचा #विनापरवाना वापर मेडिकल दुकान व ओपीडी करिता सुरु केल्याचे दिसून आले. त्यावर नगरपरिषदेने ३ ऑगस्ट २०२३ रोजी सदर बांधकाम ३० दिवसात काढून घेण्याची नोटीस बजावली होती.
तरीही #हॉस्पिटलने सदर बांधकाम काढून घेतले नाही, म्हणून बार्शी नगरपरिषदेत कार्यरत असलेले रचना सहाय्यक देवानंद जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ कलम ५३ नुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणात एक #वर्ष उलटून गेल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे, यावरुन( चिरीमिरी )काही प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची बांधकामे, छोट्या व्यावसायिकांची #अतिक्रमणे यावर नगरपरिषदेकडून तातडीने कारवाई केली जाते तशी येथे का करण्यात आली नाही? कारवाई करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली का? नगरपरिषदेने स्वतः कारवाई न करता पोलिसाकडे तक्रार का दिली? त्यासाठी एक वर्षाचा कालावधी का लागला? यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक, हातावर पोट भरणारे व्यावसायिक तर दुसरीकडे प्रतिष्ठीत लोक असा भेदभाव कारवाईबाबत बार्शी नगरपरिषद करत आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.