कोलकत्ता येथील अर्जी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि खून या घटनेचा सर्व स्तरातून होत आहे निषेध..

कोलकाता येथील के आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तेवढ्याच क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर आता पीडितेच्या वडिलांचं दुःख समोर आलं आहे. माझी मुलगी ओपीडीमध्ये काम करत होती. पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत कुणीही तिला
बोलवलं नाही किंवा कुणीही ती कुठे आहे हे बघायलाही गेलं नाही याचं मला खरंच आश्चर्य वाटतं आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. वडिलांनी केलेल्या या दाव्यामुळे मेडिकल कॉलेजवर प्रश्न उपस्थित आहेत.
कोलकाता बलात्कार
प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 खुलासे

 1) असामान्य लैंगिकता आणि जननेंद्रियाच्या छळामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या खाजगी भागावर खोल जखमा आढळल्या.

 २) आरडाओरडा थांबवण्यासाठी नाक, तोंड आणि घसा सतत दाबला गेला, गळा दाबल्यामुळे थायरॉईड कूर्चा तुटला.

 ३) ओरडू नये म्हणून डोके भिंतीवर दाबले, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमा आढळल्या.

 4) एवढ्या जोरात हल्ला केला की चष्म्याचे तुकडे डोळ्यात घुसले, दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाला.

 5) तिच्या चेहऱ्यावर आरोपीच्या नखांनी स्क्रॅचच्या खुणा आढळल्या, यावरून पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**