सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण
सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय बार्शी येथे दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी-विशेष मोहिम शिबीराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहज व सुलभ सुविधा प्रदान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि शिबिराच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
साथीच, बार्शी शहरातील गाडेगाव रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना दिले. आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार एफ.आर. शेख, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी बोपलकर, निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार संजीवन मुंडे आणि कौरव माने यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.