मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टेटस कसे चेक करायचे...
लाडकी बहीण योजनेविषयी
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली असून, नुकतंच या योजनेत सहभागी असणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार आतापर्यंत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोट्यवधी अर्थांची माहिती समोर आली आहे. पण, या सर्वच अर्जांमधून सर्वांनाच योजनेत नमूद करण्यात आलेली रक्कम मिळेल असं नाही. कारण, ही रक्कम मिळण्यासाठी अर्जावर काही गोष्टींची नोंद असणं महत्त्वाचं ठरत आहे.
अर्ज पूर्ण आहे की प्रलंबित?
Pending Status - पेंडिंग अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास सदर अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं.
Reject Status - अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द असा शेरा असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल्याचं लक्षात घ्यावं.
Review Status - अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे असं समजा.
Approval Status - हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दर्शवतो.
वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळते. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं.