बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी,डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या आरोपीलां घेतले जाळ्यात...
#बार्शी शहर पोलीस स्टेशनची ऑनलाईन फसवणूक करणा-या #टोळीविरूद्ध दमदार कामगीरी...
बार्शी शहर पोलीस ठाणे येथे दिनांक 29/05/2024 रोजी फिर्यादी श्री सुजित वसंत काटकर वय.50 वर्षे व्यवसाय. डॉक्टर रा.पाटील प्लॉट, #बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनीपोलिसात तक्रार दिली होती, दिनांक 05/01/2024 ते दिनांक 05/02/2024 च्या दरम्यान त्यांचे मोबाईलमध्ये Mood हे #अँप्लीकेशन उघडण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देतो असे सांगून 9,50,000/-रूपयाची फसवणूक केली होती. सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक पद्धतीने तपास करून अज्ञात आरोपी यांचे नावे निष्पन्न करून मोबाईल लोकेशनद्वारे त्यांचा शोध घेण्यात आला. सदर आरोपीचे लोकेशन हे इंदोर राज्य मध्यप्रदेश येथे असल्याने बार्शी शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून इंदोर येथे पाठविले. पोलीस पथक यांनी इंदोर येथे जावून गुन्हयातील संशयीत आरोपी नाव 1) लाला उर्फ कमल नरेंद्र सोनी वय.35 वर्षे रा. कनावटी, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश 2) भगवानदास उर्फ विकी कन्हैयलाल आवताणी वय. 38 वर्षे रा. विकास नगर, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश 3) मनीष घनशाम बैरागी वय. 30 वर्षे रा.भगाणा रेल्वे स्टेशनजवळ, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले आहे . त्यांना ताब्यात घेताना त्यांच्याकडे एक लॅपटॉप, 16 मोबाईल्स, 86 विविध कंपनीचे सिमकार्ड, 15 बँकेचे चेकबुक व पासबुक, 08 ए.टी.एम असे मिळून आल्याने जप्त करण्यात आलेले आहे.
सदर आरोपीना बार्शी येथे आणून दिनांक 10/सप्टेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना दिनांक 11/सप्टेंबर /2024 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यातील मुख्य आरोपी क्रं. 1 यास 05 दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे व आरोपी क्रं 2 व 3 यांना #न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यामध्ये आतंरराज्यीय ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी आहे त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे यांच्या अधिपत्याखाली सपोनि/श्री दिलीप ढेरे, सपोनि/श्री बाळासाहेब जाधव, पोउपनि/महेश गळगटे, पोउपनि/उमाकांत कुंजीर व पोलीस अमंलदार पोहेकॉ/164 बाळकृष्ण डबडे, पोकॉ/1942 लखन घाडगे, पोकॉ/1195 सचिन नितनात, पोकॉ/2193 गणेश अंकुशराव, पोकॉ/2132 धनराज फत्तेपुरे, पोकॉ/937 अविरथ बरबडे यांनी तसेच सायबर पोलीस विभाग सोलापूर येथील पोकों/रतन जाधव यांनी केलेली आहे.