विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाची उकल पोलिसांना
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाची उकल पोलिसांना
पुणे: विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. ९ डिसेंबर रोजीसतीश वाघ यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या अपहरण करून आणि त्यांना कारमध्ये ठार मारून करण्यात आली. हत्येचा एक धक्कादायक उलट तपास पुढे आला आहे, ज्यामध्ये सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच हत्या करण्यासाठी सुपारी दिली असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते, आणि याच कारणामुळे सतीश वाघ यांच्या हत्या करण्याची योजना आखली गेली. ९ डिसेंबरला सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी अक्षय जावळकर, त्याचा मित्र पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे हे कारमध्ये लपले होते. सतीश वाघ घरापासून काही अंतरावर असताना, अक्षयनं कार त्यांच्याजवळ आणली आणि त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पुणे-सोलापूर महामार्गावर नेलं. त्याठिकाणी त्यांच्यावर ७० वार केले आणि त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला.
पोलिसांच्या तपासात हे उघडकीस आले की, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी केली गेली. हत्येच्या नंतर, मोहिनी वाघ आणि त्यांच्या मुलांसोबत रडत होत्या आणि पतीच्या हत्येचे दु:ख दर्शवित होत्या, परंतु पोलिसांच्या चौकशीत त्यांची भूमिका संशयास्पद ठरली.
पोलिसांनी वाघ कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या ११ वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधांचा तपास केला. त्याचवेळी अक्षय जावळकर गायब झाला, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. अक्षय आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, अक्षयने हत्या करण्याची योजना पोलिसांना कबूल केली.
२५ डिसेंबरला मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली, आणि हत्येचा तपास पूर्णपणे उलगडला. हत्येच्या नेमक्या कारणांची उकल होऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
#pune #watch #kdmnews #BreakingNews #महाराष्ट्र #क्राईम न्यूज #पुणे पोलीस