सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फसवणूक प्रकरण: आर्यन शुगर संचालक मंडळावर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फसवणूक प्रकरण: आर्यन शुगर संचालक मंडळावर गुन्हा दाखल

KDM NEWS प्रतिनिधी :-बार्शी, ३ जानेवारी २०२५ - आर्यन शुगर प्रा.लि., खामगांव, ता. बार्शी येथील साखर कारखान्याच्या संचालक व बँकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर कर्ज फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. बार्शी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या शाखेतील शाखाधिकारी राहूल लक्ष्मण खुने यांनी शंभर कोटींच्या कर्जासंदर्भात फसवणुकीसंबंधी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात, आर्यन शुगर प्रा.लि. यांना १८ सप्टेंबर २०१२ रोजी ५५ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जाची अटी नुसार, साखर गोडावुनमध्ये ठेवण्याची शर्त होती. तथापि, आरोप आहे की, कारखान्याच्या संचालकांनी गोडावुनमधील साखर विक्री केली आणि त्या विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम बँकेच्या कर्ज खात्यात न भरता इतर कर्ज खात्यात जमा केली. त्यामुळे बँकेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

यामध्ये मुख्य आरोपी म्हणून आर्यन शुगर प्रा.लि. चे संचालक योगेश सुधीर सोपल, त्यांची पत्नी, सुधीर गंगाधर सोपल, त्यांची पत्नी, विलास दगडूअप्पा रेणके, अविनाश बसंतराव भोसले, श्रीकांत गोपाल नलवडे, राजू बसंतराव भोसले, तसेच बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी आर. एस. उबेरदंड आणि बँक इन्स्पेक्टर व्ही. एस. आगलावे यांचा समावेश आहे.

बँकेच्या निरीक्षकाने दिलेल्या अहवालानुसार, साखरेची विक्री करून आलेली रक्कम कर्ज खात्यात न भरता इतर खात्यात भरली गेली, त्यामुळे बँकेच्या मालतारण कर्ज खात्यात ४२,२५,४९,४८४ रुपये बाकी राहिले. या फसवणुकीमुळे बँकेला आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली असून, संबंधित तक्रार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**