महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने या
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने या
योजनेची स्थापना केली आहे. याचा मुख्य उद्देश विविध योजनांद्वारे बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी फायदे पुरवणे आहे. योजनेमध्ये कामकाजी परिस्थिती सुधारून कौशल्य विकास, रोजगार क्षमता वाढविणे, तसेच सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांची अंमलबजावणी केली जाते.
योजनेचे वैशिष्ट्य
महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना
बांधकाम कामगारांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत
लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आणि आरोग्यविषयक सहाय्य मिळवून देणे
अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं फेऱ्या वाचवतात
लाभार्थी
बांधकाम क्षेत्रातील कामगार, जसे की इमारत बांधणे, रस्ते तयार करणे, रेल्वे व इतर संरचनांसाठी काम करणारे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पात्रता
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा
वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या आत असावे
९० दिवसापेक्षा जास्त वेळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे
लाभ
कामगारांना आर्थिक सहाय्य, मोफत जेवण, विमा योजना, आणि इतर कल्याणकारी लाभ मिळतात.
घरकुल योजना, शिक्षण सहाय्य, आणि कामाच्या ठिकाणी पाळणाघर सुविधा उपलब्ध असतात.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन, वेळ आणि पैसा वाचवते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवाशी दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र
रेशन कार्ड
बँक खात्याची माहिती
९० दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र
--