बार्शी शहरात चोरीची घटना, चार ते पाच दुकानांमध्ये शटर उचकटून चोरी

बार्शी शहरात चोरीची घटना, चार ते पाच दुकानांमध्ये शटर उचकटून चोरी

KDM NEWS बार्शी प्रतिनिधी :20 जानेवारी 2025 रोजी बार्शी शहरातील तेलगिरणी चौक, शिवाजी आखाडा , आडवा रस्ता, तुळजापूर रोड, व लातूर रोड परिसरात धक्कादायक चोरीची घटना घडल्या आहेत. पहाटे चार ते साडेचार त्या  वेळेत चोरट्यांनी चार ते पाच या वेळेत दुकानांचे शटर उचकटून दुकानांमधील नगदी, आणि इतर मौल्यवान वस्तू लांबवल्या आहेत. या घटनेमुळे दुकानदारांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे.

चोरी झालेल्या दुकानदारांचे नुकसान गंभीर असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या दुकांनांवर बार्शी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, तरीही पोलिसांच्या गस्तीत चोरट्यांनी या दुकानांमध्ये प्रवेश केला असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचलेली नसल्याने, नागरिकांमध्ये अफवांचा पाऊस सुरू झाला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे, तसेच व्यापाऱ्यांनी अधिक कडक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

स्थानीय नागरिकांनी पोलिसांना तातडीने तपास सुरू करण्याची विनंती केली आहे. पोलिसांच्या वेगवान कार्यवाहीमुळे चोरट्यांचा शोध लवकर लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल