बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात केस गळण्याची घटना, पाणी दूषित असल्याचे उघड
बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात केस गळण्याची घटना, पाणी दूषित असल्याचे उघड
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा आणि हिंगणा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य विभागाने या प्रकरणाची तपासणी केली असता, वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक अत्यधिक प्रमाणात आढळला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टॉटल डिसॉल्व्ड सॉलिड्स (टीडीएस) लेव्हलही अत्यंत उच्च असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे या पाण्याचा वापर अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
केस गळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक चिंतेत असून, ते पाणी वापरणे सुरक्षित नाही, अशी चिंता व्यक्त करत आहेत. आरोग्य विभागाने लवकरात लवकर या प्रकरणी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासनाने पाणी स्वच्छीकरणाचे उपाय सुरू केले असले तरी, नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक कडक उपाययोजना आवश्यक आहेत.
स्थानिक नागरिकांनी सरकारकडे त्वरित पाणी दूषित होण्याची समस्या सोडवण्यासाठी मदतीची मागणी केली आहे, अन्यथा अधिक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पण्या