अनैतिक प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

अनैतिक प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

बार्शी, १ मार्च २०२५ – अनैतिक प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने पतीचा कट रचून खून केल्याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील महागाव पुलाजवळ घडली.

१९ फेब्रुवारी रोजी महागाव पुलाजवळील तलावात दोन पुरुषांचे मृतदेह आढळले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतांची ओळख गणेश अनिल सपाटे (वय २५, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि शंकर उत्तम पटाडे (वय ४०, रा. यशवंत नगर, बार्शी) अशी पटली.

तपासादरम्यान, गणेश सपाटे आणि शंकर पटाडे यांच्या पत्नी रूपाली शंकर पटाडे (वय ३५) यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. या प्रेमसंबंधांना शंकर पटाडे हा वारंवार अडथळा ठरत होता. त्यामुळे गणेश आणि रूपाली यांनी त्याचा खून करण्याचा कट रचला.

पाण्यात ढकलून खून
गणेश सपाटे याने शंकर पटाडे यास दारू पाजून महागाव पुलावर नेले. त्याठिकाणी त्याने शंकर पटाडे याला उचलून तलावात फेकले. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत गणेश सपाटे याचाही तोल गेला आणि तोही पाण्यात पडून मरण पावला.

पत्नीची कबुली आणि अटक
पोलिसांनी रूपाली पटाडे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने कट रचल्याची कबुली दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाळकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलिसांनी केली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल