**पीएसआय विद्या एम. व्ही. यांच्याविरोधात कॉल डिटेल्स गैरवापरप्रकरणी गुन्हा कायम राहणार**

**पीएसआय विद्या एम. व्ही. यांच्याविरोधात कॉल     डिटेल्स गैरवापरप्रकरणी गुन्हा कायम राहणार**

**KDM NEWS प्रतिनिधी**बेंगळुरू – पोलिस उपनिरीक्षक विद्या एम. व्ही. यांच्याविरोधात भावनास एस. या महिलेच्या कॉल डिटेल्स (सीडीआर) अनधिकृतरीत्या मिळवून त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली.

भावना एस. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीएसआय विद्या यांनी काही इतर आरोपींसोबत संगनमत करून त्यांच्या कॉल डिटेल्स मिळवून तिसऱ्या व्यक्तीकडे पाठवले. या कॉल डिटेल्सचा वापर करून तिला मानसिक त्रास देण्यात आला.

या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 354(d), 409, 506, 509 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलम 66(D) आणि 66(E) खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने सांगितले की, संबंधित पोलिस अधिकारी कोणत्याही अधिकृत तपासाचा भाग नव्हता, तरीही त्यांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया न पाळता सीडीआर मागवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ पोलिस असल्यामुळे कोणीही नागरिकाचा कॉल डिटेल मागवू शकत नाही.

पीएसआय विद्या यांच्याकडून गुन्हा अधिकृत कर्तव्याअंतर्गत झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच सीआरपीसी कलम १९७ आणि कर्नाटक पोलिस कायदा कलम १७० नुसार पूर्वमंजुरी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने या सर्व युक्तिवादांना अमान्य ठरवत गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.

या निर्णयामुळे पोलिस अधिकाऱ्यांना तपासाशी संबंध नसताना नागरिकांच्या खासगी माहितीकडे हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून, गोपनीयतेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल