**बार्शी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मुंबईतील उद्योगपती रवी कोयले यांचे साहित्यिक मदत वितरण**

**बार्शी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मुंबईतील उद्योगपती रवी कोयले यांचे साहित्यिक मदत वितरण** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. २७ : सप्टेंबर २०२५ मध्ये बार्शी तालुक्यातील ११ महसूल मंडळांत तीन ते चार वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुका प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली असताना, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक श्री. रवी नामदेव कोयले यांनी गावाशी असलेली नाळ कायम ठेवत बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचा निर्णय घेतला. मौजे खडककलगाव व मुंगशी आर या गावांमध्ये ८० ते १०० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक पोते युरिया खत, एक एकर ज्वारी पेरणीसाठी लागणारे बियाणे व कीडनाशक म्हणून इमामेक्टिन बेंजोएट हे कीटकनाशक वाटप केले.

श्री. कोयले हे शेडशिंगे गावचे मूळ रहिवासी असून, शिक्षणानंतर मुंबईत बांधकाम क्षेत्रात यशस्वी उद्योगपती म्हणून कार्यरत आहेत. तरीही ते गाव व शेतीशी जोडलेले राहिले. अतिवृष्टीने हाहाकार उडालेल्या शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांनी वाटप कार्यक्रम आयोजित केला. यावेळी श्री. कोयले म्हणाले, "परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही खचून जावू नये. आवश्यकता वाटल्यास यापुढेही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत." या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अश्रू पुसले गेले.

कार्यक्रमात शेडशिंगे गावचे मूळ रहिवासी व उद्योगपती श्री. रवी नामदेव कोयले, उपसरपंच श्री. वैभव कोयले, श्री. पांडुरंग गायकवाड, तालुका कृषी अधिकारी श्री. संतोष कोयले, कृषी अधिकारी श्री. प्रसेनजित जानराव, श्री. सयाजी गायकवाड, अतुल जगताप, श्री. कृष्णा शेळके, श्री. सुहास साठे, सौ. रेणुका दराडे, खडककलगावचे सरपंच श्री. दीपक रोंगे, मुंगशी आर येथील उपसरपंच श्री. संतोष कुरुंद व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, सरकारी मदतीबरोबरच खासगी पातळीवरील अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**