**बार्शीत वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस विरोधात भव्य मोर्चा; बार्शी शहर बंद, तहसीलदारांना मागण्या सादर**
**बार्शीत वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस विरोधात भव्य मोर्चा; बार्शी शहर बंद, तहसीलदारांना मागण्या सादर**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, २८ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर कायमची बंदी घालण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज शहरव्यापी बंदची हाक दिली. सकाळपासून बाजारपेठा बंद राहिल्या, तर शहराध्यक्ष रेखा सरवदे व इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात फूलवाले चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. संभाजीनगरमधील नुकत्याच झालेल्या मोर्चानंतर ही मागणी आता ग्रामीण भागातही जोर धरत असल्याचे दिसते.
मोर्चाचे नेतृत्व अॅड. विवेक गजशिव व धनंजय जगदाळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फूलवाले चौकातून सुरू झालेला हा मोर्चा लोखंडे गल्ली व पांडे चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी सहकार्य करीत बंद पाळला.
या मोर्चाला प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, कम्युनिस्ट पक्षाचे तानाजी ठोंबरे व प्रवीण मस्तूद, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशिद, काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, भीमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे, डीपीआयचे आशीष शिंदे व आनंद चांदणे, मराठा सेवा संघाचे आबा काळे यांनी पाठिंबा दिला. आरएसएसचा निषेध करताना या नेत्यांनी मोर्चाला सामर्थ्य प्रदान केले.
तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर अॅड. गजशिव यांनी तीव्र भाष्य केले. "आरएसएस ही देशद्रोही व अतिरेकी संघटना आहे, जी जाती-जाती व धर्म-धर्मात भांडण लावते. स्वातंत्र्यलढ्यात तिचा कोणताही वाटा नाही. तिची कोणतीही नोंदणी नसल्याने तिच्यावर कायमची बंदी घालावी," असे त्यांनी सांगितले. तहसीलदार एफ. आर. शेख यांना सादर केलेल्या प्रमुख मागण्या अशा होत्या :
- आरएसएस वर कायमची बंदी घालणे.
- छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरी तरुणांवरील गुन्हे मागे घेणे.
- अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग बांधवांना मारहाण केलेल्या आरएसएस गुंडांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई.
- सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रावर कठोर कारवाई.
या मोर्चासाठी अश्वकुमार अहिरे, किरण भालशंकर, सूरज भालशंकर, बालाजी अंधारे, अतिश बनसोडे, पंकज खूने, बंटी शिंदे व महिलांमध्ये सुलक्षणा खूने, विद्या कदम, कांताबाई गजधने, रंजना बोकेफोडे, सोनाली गायकवाड, अंजली धांडोरे, राधा ननवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वंचित बहुजन आघाडीचे या आंदोलनाने आरएसएस विरोधातील लाट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पसरत असल्याचे चित्र आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या