**सोलापूरच्या राजकारणाचा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा**
**सोलापूरच्या राजकारणाचा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई | प्रतिनिधी** आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेणारी बैठक पार पडली. पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख आणि जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित होते.
सोलापूरमधील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवार, पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर चर्चा झाली. पक्षाने ५० टक्के उमेदवारी नव्या चेहऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. शेतकरी, मजूर आणि शहरी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्याचे ठरले.
मोहोळ, पंढरपूर आणि माढा तालुक्यांतील बदलती समीकरणे, माजी नेत्यांचे पक्षांतर आणि महाविकास आघाडीशी समन्वय यावरही चर्चा झाली. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पक्षाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि घरोघरी प्रचार मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सोलापूरात भाजप आणि अजित पवार गटाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पक्षाने ठोस रणनीती आखली असून, निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या