**सोलापूर ग्रामीणमध्ये कलम ३७(१) लागू; कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पावले**
**सोलापूर ग्रामीणमध्ये कलम ३७(१) लागू; कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पावले**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. २४ : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुंड प्रवृत्तीच्या घटकांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) लागू करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली. हा आदेश २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अंमलात राहील. लागू असलेला परिसर सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय वगळता) आहे.
या कलमानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे जमाव, मिरवणुका, सभा; शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेल्या काठ्या किंवा इजा करण्यास उपयुक्त वस्तू; ज्वालाग्राही किंवा स्फोटक पदार्थ; दगड फेकण्याची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन; सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव आणि ग्राम्य भाषा; तसेच जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य यांवर पूर्ण बंदी आहे.
मात्र, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांसाठी या वस्तूंचा वापर करण्यास सूट आहे. तसेच जिल्हादंडाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक किंवा दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी विशेष परवानगी दिलेल्यांना अपवाद राहील. हे आदेश दिवाळी उत्सव, यात्रा आणि संभाव्य सामाजिक तणाव लक्षात घेऊन लागू करण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
#SolapurRural #PoliceAct37_1 #LawAndOrder #SolapurNews #MaharashtraPolice #ProhibitoryOrder #SolapurDistrict
टिप्पण्या