**बार्शी-कोल्हापूर हायकोर्ट स्पेशल बससेवा उद्यापासून धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा**
**बार्शी-कोल्हापूर हायकोर्ट स्पेशल बससेवा उद्यापासून धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बार्शी ते कोल्हापूर अशी थेट हायकोर्ट स्पेशल बससेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्यापासून म्हणजेच शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता बार्शी बस स्थानकातून पहिली बस रवाना होणार असून, याचा शुभारंभ औपचारिक सोहळ्यात होणार आहे.
बार्शी, धाराशिव, लातूर परिसरातील असंख्य नागरिकांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठात (बेंच) कामानिमित्त नियमित ये-जा करावी लागते. आतापर्यंत खाजगी वाहनं किंवा बदलून प्रवास करावा लागत होता. ही नवीन सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे.
**बसचे वेळापत्रक व मार्ग :
दिशा : बार्शी → कोल्हापूर
निघणे : सकाळी ६.०० वाजता (बार्शी बसस्थानक)
मार्ग : बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - मंगळवेढा - जत - मिरज - जयसिंगपूर - हातकणंगले - कोल्हापूर
पोहोचणे : दुपारी १२.०० वाजता (कोल्हापूर बसस्थानक)
दिशा : कोल्हापूर → बार्शी (परतीचा प्रवास - दोन फेऱ्या)
१) निघणे : सकाळी ६.०० वाजता (कोल्हापूर) → पोहोचणे : दुपारी १.०० वाजता (बार्शी)
२) निघणे : दुपारी २.०० वाजता (कोल्हापूर) → पोहोचणे : रात्री ८.०० वाजता (बार्शी)
या सेवेमुळे बार्शी-कोल्हापूर एका बाजूला साधारण ६ तासांचा प्रवास राहणार आहे. ही बस अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली आहे.
बार्शी आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर-दराडे यांनी सांगितले की, “हायकोर्टात कामानिमित्त येणाऱ्या वकिल, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. प्रवासी संख्येचा विचार करता ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा मानस आहे. सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.”
या बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास लवकरच अतिरिक्त फेऱ्या व इतर सुविधा देण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती आगारातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या